बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    दर्शनिका विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या कार्यात कालानुरूप विविधता आली आहे. आता त्याची व्याप्ती केवळ ‘जिल्हा गॅझेटिअर’पुरती मर्यादित राहिलेली नाही. या विभागाने राज्याचे आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध प्रकाशन-मालिकांच्या निर्मितीमध्येही पाऊल टाकले आहे. या प्रकाशन-मालिकांची यादी खालीलप्रमाणे आहे –

    1. जिल्हा गॅझेटिअर (ब्रिटिशकालीन) – पुनर्मुद्रण.
    2. जिल्हा गॅझेटिअर (सुधारित आवृत्ती).
    3. जिल्हा गॅझेटिअर (मराठी).
    4. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (मराठी आणि इंग्रजी).
    5. स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधारसाहित्य.
    6. स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश.

    विभागाचे कामकाज: गॅझेटिअर ग्रंथाच्या लेखनासाठी या विभागाला विस्तृत व सखोल ऐतिहासिक माहिती गोळा करावी लागते. ही माहिती विखुरलेले जुने अभिलेख, अहवाल, प्रकाशने, पत्रव्यवहार, व्यक्तिगत भेटी तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे गोळा करण्यात येते. जमविलेल्या सर्व माहिती व आधार साहित्याचे वर्गीकरण, सुसूत्रीकरण व तपासणी करून लेखन केले जाते. लेखन केलेल्या प्रकरणाची तपासणी व दुरुस्ती करून अंतिम संपादन करण्यात येते. काही महत्त्वाच्या विषयांवर विद्वान तज्ज्ञांकडूनही मानधन तत्त्वावर लेखन करून घेतले जाते. तथापि, बहुतेक लेखन या विभागातील अधिकारी व कर्मचारी करतात. अंतिम संपादनानंतर तयार झालेला सर्व मजकूर संपादक मंडळाच्या सभासदांकडे छाननी व सूचनाकरिता पाठविला जातो. यानंतर त्यास अंतिम स्वरूप देण्यात येते.