निवेदन

ई - बुक आवृत्ती       

ध्वनी

सातारा जिल्हा गॅझेटिअरची ई-बुक आवृत्ती काढतांना मनापासून आनंद होत आहे. मुलतः सातारा जिल्हा गॅझेटिअरची ब्रिटीश आवृत्ती १८८५ मध्ये प्रकाशित झाली तर त्याची सुधारित आवृत्ती सन १९६३ मध्ये निर्माण करण्यात आली. या दोन्ही आवृत्तीचे ई-बुक मध्ये परिवर्तन करुन तसेच महाराष्ट्रातील संबंधीत सर्व ब्रिटीशकालीन जिल्हा गॅझेटिअर आणि स्वातंत्र्यानंतर प्रकाशित झालेले सर्व सुधारित जिल्हा गॅझेटिअर शासनाच्या संकेत स्थळावर (www.maharashtra.gov.in) अधिकृतपणे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

सातारा जिल्हा गॅझेटिअरची मराठी आवृत्ती सन १९९९ मध्ये प्रकाशित करण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वांगिण परिचय करुन देणारी ही वैशिष्टयपूर्ण दर्शनिका ई-बुकच्या रुपात उपलब्ध करुन देत असून ती शासनाच्या उपरोलिखित संकेत स्थळावर उपलब्ध असेल यामुळे जगभरातील सर्व मराठी भाषिकांना हा महत्वपूर्ण संदर्भ ग्रंथ उपलब्ध होईल ग्रंथात जिल्हा दृष्टिक्षेपात हे एक सुधारित परिशिष्ट दिले आहे. ज्यात २००१ च्या जनगणने आधारे नोंद केली आहे.

या कामी सतत प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करणारा सर्व संपादक मंडळ सदस्यांचे तसेच अतिरिक्त मुख्य सचिव, जॉयस शंकरन तसेच उद्योग, खनिकर्म व संस्कृतिक कार्य मंत्री, मा. श्री अशोकरावजी चव्हाण, राज्यमंत्री, मा. श्री राणा जगजीतसिहजी पाटील यांचे मी ऋण व्यक्त करतो.

टिप: संचालक राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभाग यांच्या सौजन्याने औंध वस्तुसंग्रहालयातील छायाचित्र उपलब्ध.

दिनांक : २८/१०/२००८                    डॉ. अरुणचंद्र शं. पाठक

                                        कार्यकारी संपादक व सचिव

 

Top