निवेदन

नांदेड जिल्हा दर्शनिका (गॅझेटिअर) दोन भागात या विभागाने तयार केले असून त्याची ई-बूक आवृत्तीसुध्दा उपलब्ध करुन देताना आनंद होत आहे. या मालिकेतील हे नववे पुष्प आहे. जिल्ह्याची सर्वांगिण माहिती विविध छायाचित्रे व नकाशांसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

परिवर्तित होणार्‍या व गतीने पुढे जाणार्‍या विश्वाबरोबर शासनाचा हा विभागसुध्दा वाटचाल करीत असल्याचे या ई-बूक विषयक कामामुळे स्पष्ट होईल.

जिल्ह्याची भौगोलिक व भूशास्त्रीय वैशिष्टये, ऐतिहासिक पार्श्वभूमी, मुक्ती आंदोलनातील योगदान तसेच जिल्ह्यातील लोक, त्यांच्या परंपरा व समाजजीवन, कृषी व जलसिंचन या क्षेत्रातील वाटचाल, शंकर सागर जलाशयाचे वैशिष्टय, राज्य पातळीवर उद्योगक्षेत्रात असलेले या विभागाचे स्थान स्पष्ट करणारे अनेक तपशील या ई-बूकमध्ये दिले आहेत. बँक व्यवसाय, वाणिज्य व व्यापार आर्थिक विकास, सेवाक्षेत्रातील कामे, जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा, साहित्य तसेच जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे यांचे तपशील नोंदविणारी ही दर्शनिका सर्व अभ्यासक, संशोधक व विशेषत्वाने विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. या ई-बूक निर्मितीसाठी सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल मी मा. ना. श्री संजय देवतळे (मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य), मा. ना. श्रीमती फौजिया खान (राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य व अन्य विभाग), श्री. आनंद कुलकर्णी (प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य) व अन्य सहकार्‍यांचे ऋण व्यक्त करतो.

अरुणचंद्र शं. पाठक
कार्यकारी संपादक व सचिव

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player