निवेदन

ई - बुक आवृत्ती       

वर्धा जिल्हा ई-बूक आवृत्ती सादर करताना मनापासून आंनद होत आहे. मूळत: वर्धा जिल्हा गॅझेटिअरची ब्रिटीशकालीन आवृत्ती 1906 मध्ये प्रकाशित झाली. त्याची सुधारित इंग्रजी आवृत्ती 1974 ला तयार करण्यात आली. या दोन्ही आवृत्तीचे ई-बूकमध्ये रुपांतर करण्यात आले असून महाराष्ट्राशी संबंधित सर्व ब्रिटीशकालीन जिल्हा गॅझेटिअर आणि स्वातंत्र्यानंतर प्रकाशित करण्यात आलेल्या सर्व सुधारित जिल्हा गॅझेटिअर शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) अधिकृतपणे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

वर्धा जिल्ह्याची मराठी आवृत्ती तत्कालीन संपादकांनी 1992 मध्ये प्रकाशित केली. जिल्ह्याचा सर्वांगीण परिचय करुन देणारी ही वैशिष्टयपूर्ण दर्शनिका ई-बूकच्या स्वरुपात उपलब्ध करुन देत असून ती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. यामुळे जगभरातील सर्व मराठी अभ्यासकांना हा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ सहजतेने हाताळता येईल. या ग्रंथात जिल्हा दृष्टक्षेपात हे एक सुधारित परिशिष्ट दिले असून त्यामध्ये सन 2001 च्या जनगणनेआधारे नोंदी करण्यात आल्या आहेत. या कामी सतत प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करणाऱ्या संपादक मंडळ सदस्यांचा मी आभारी आहे.

प्रधान सचिव श्री.आनंद कुलकर्णी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुख्यमंत्री मा.पृथ्वीराजजी चव्हाण, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, मंत्री सांस्कृतिक कार्य मा.श्री.संजय देवतळे, राज्यमंत्री मा.श्रीमतही फौजिया खान यांनी दिलेल्या प्रेरणेसाठी मी त्यांचा ॠणी आहे. हे ई-बूक सर्व अभ्यासकांना निश्चितपणे उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.

दिनांक :2 ऑक्टोबर 2011, डॉ. अरुणचंद्र शं. पाठक
अश्विन शु. ६, शालीवाहन शके १९३३. कार्यकारी संपादक व सचिव

Top